महाराष्ट्र
कडोंमपा क्षेत्रातील तीन शाळा अनधिकृत
कडोंमपा क्षेत्रातील तीन शाळा अनधिकृत
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय सुरु असलेल्या तीन अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या तिन्ही शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून यामध्ये एस.जी.टी एलिमेंटरी स्कूल, सांगोडा रोड, स्मशानभूमीजवळ, मांडा टिटवाळा, संकल्प इंग्रजी स्कूल, बल्याणी टिटवाळा, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, डोंगरवाली माता मंदीर, बल्याणी टेकडी, टिटवाळा (पू) या तीन शाळांचा समावेश आहे.
सर्व संबंधित पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येईल. संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475