महाराष्ट्र

भीमाशंकरला निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

भीमाशंकरला निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू
भीमाशंकरला निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू फोटो: ठाणे वैभव
कल्याण-मुरबाड रस्त्यावर आर्टिगाची झाडाला धडक कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावर एका आर्टिगाला भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही आर्टिगा थेट झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. कल्याणवरून भीमाशंकरला महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या गाडीला कल्याण-मुरबाड रस्त्यावर भीषण अपघात झाला. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वडापा गावाजवळ कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही अर्टिगा कार थेट झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जबर होती की त्यात आर्टिगाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दोघे किरकोळ जखमी आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भीमाशंकरला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हे सहा मित्र निघाले होते. या गंभीर अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अश्विन भोईर, प्रतीक चोरगे आणि नरेश म्हात्रे अशी मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोघेजण कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील राहणारे आहेत. एकजण टिटवाळाजवळील गोवेली परिसरात राहत होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475