जिल्हा

वायफाय राऊटरच्या स्फोटात तीन जण जखमी

वायफाय राऊटरच्या स्फोटात तीन जण जखमी
वायफाय राऊटरच्या स्फोटात तीन जण जखमी फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायमा शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राऊटरचा स्फोट झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475