जिल्हा

अंबरनाथमध्ये भाजपाकडून तीन शहराध्यक्ष नियुक्त

अंबरनाथमध्ये भाजपाकडून तीन शहराध्यक्ष नियुक्त
अंबरनाथमध्ये भाजपाकडून तीन शहराध्यक्ष नियुक्त फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : अंबरनाथ शहर भाजपा नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. विश्वजीत करंजुले-पाटील, प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत या तीन जणांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षांतर्गत मंडल अध्यक्ष बदलण्याच्या प्रक्रियेनुसार अंबरनाथ शहर अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अंबरनाथ पूर्वच्या अध्यक्षपदी विश्वजित करंजुले-पाटील यांची तर पश्चिमेला प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत या दोन जणांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या उपस्थितीत निरीक्षक संजय आदक यांनी पूर्व आणि पश्चिम भागातील विश्वजित करंजुले-पाटील, लक्ष्मण पंत, प्रजेश तेलंगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन, त्यांची मते जाणून घेऊनच अध्यक्षपदी नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रतिपादन गुलाबराव करंजुले-पाटील यांनी सांगितले. येत्या काळात अंबरनाथमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष असेल आणि अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता हमखास आणणार असल्याचा दावा श्री. करंजुले यांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475