जिल्हा

अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचा सज्जा कोसळून तिघे जखमी

अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचा सज्जा कोसळून तिघे जखमी
अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचा सज्जा कोसळून तिघे जखमी फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: वसई पश्चिमेला माणिकपूर नाक्यापासून हाकेच्या अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली इमारतीच्या सज्जाचे बांधकाम कोसळून तीन जण जखमी झाले असून दोन रिक्षांचेही नुकसान झाले आहे. माणिकपूर येथील अर्बन बँकेसमोरील तीन मजली बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या सज्जाचा काही भाग दुपारी ३ च्या सुमारास कोसळला. या घटनेत रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांचे नुकसान झाले असून तीन जणांना दुखापत झाली आहे. जखमी व्यक्तींना बंगली येथील कार्डिनल ग्रेशस इस्पितळात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475