जिल्हा

मध्य रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्ड (एलटीटी यार्ड) मधील विविध कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द आणि काही रेल्वे गाड्यांच्या थांब्यांमध्येही बदल केला आहे. 26 नोव्हेंबर रोजी रात्री 12.50 वाजेपर्यंत पाच रेल्वे गाड्या ठाण्यापर्यंतच चालविण्यात येतील. 27 नोव्हेंबर रोजी रात्री 12.40 ते पहाटे 5.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी रात्री एक ते सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी सुटणारी अयोध्या छावणी एलटीटी एक्सप्रेस आणि शालीमार एलटीटी एक्सप्रेस तसेच विशाखापट्टणम एलटीटी एक्सप्रेस आणि 26 नोव्हेंबर 24 रोजी सुटणारी गोरखपूर एलटीटी अतिजलद एक्सप्रेस 27 नोव्हेंबर २४ रोजी सुटणारी बल्लारशाह एलटीटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475