जिल्हा

चोरट्यांनी ४० तोळे सोन्याचे दागिने केले लंपास

चोरट्यांनी ४० तोळे सोन्याचे दागिने केले लंपास
चोरट्यांनी ४० तोळे सोन्याचे दागिने केले लंपास फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील ४० तोळे सोने आणि ५० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील एका गृहसंकुलात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वेकडील देसलेपाडा भागातील आर.पी. रेसीडेन्सी गृहसंकुलात राहणारे अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी उत्तरप्रदेश येथे लग्न समारंभासाठी गेले होते. घर बंद राहणार असल्याने यादव कुटुंबीयांनी या कालावधीत पेस्ट कंट्रोलचे काम करून घेतले होते. ९ फेब्रुवारी रोजी यादव यांच्या घरात पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित बंद होते. त्यानंतर आठवड्याने मायादेवी व त्यांचे पती यादव यांच्या घरी दुपारच्या वेळेत गेले होते. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घर व्यवस्थित बंद केले असताना मायादेवी आणि त्यांच्या पतीला घराचा संरक्षित बाहेरचा दरवाजा आणि आतील दरवाजा यांचा कडीकोयंडा, कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी व आतील तिजोरीची दारे तोडलेली आढळली. घरात चोरी झाल्याची माहिती अशिष यादव यांना देण्यात आली. प्राथमिक चौकशीत घरातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475