जिल्हा

स्कायवॉकवर चोरट्यांचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

स्कायवॉकवर चोरट्यांचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
स्कायवॉकवर चोरट्यांचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याणातील स्कायवॉकवर दोन अज्ञात चोरट्यांनी भाजी विक्रेत्यावर दगडाचा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचे पैसे, मोबाईल लुटून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी दगडाचा हल्ला करीत भाजी विक्रेता सुरेश सिंग यांस गंभीर जखमी करून त्याच्या खिशातून सहा हजार रुपये आणि मोबाईल चोरी करून पोबारा केला. या हल्ल्यात सुरेश सिंह गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात चोरट्या आरोपीचा शोध सुरू केला असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून मिळाली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475