जिल्हा

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही
शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 पर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेऊन निगा देखभाल व दुरूस्तीमधील अत्‌यावश्यक व तातडीची कामे करुन घेण्यात येणार आहेत. या शटडाऊन कालावधीत शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475