मनोरंजन

ऍक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला 'शिवाचा' येणारा आठवडा

ऍक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला 'शिवाचा' येणारा आठवडा
ऍक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला 'शिवाचा' येणारा आठवडा फोटो: ठाणे वैभव

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवी मालिका 'शिवा' लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्याभागा पासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. ह्या आठवड्यात प्रेक्षक शिवा या मालिकेत पाहू शकतील शिवा आणि आशुतोषच्या जीवनातल्या होणाऱ्या हालचाली. मंदिरात गुरुजीं आशुतोषचे लवकरच लग्न होणार अशी बातमी देतात, पण देसाईंच्या घरी लक्ष्मी नाही तर दुर्गा प्रकट होणार हे देखील सांगतात, यावर सगळ्यांना धक्का बसतो.

तर दुसरीकडे दिव्या शिवाला वधू पाहण्याचा सोहळा थांबवण्याची विनंती करते. दरम्यान, दिव्याच्या या स्वार्थामुळे शिवा अडचणीत येते. येणाऱ्या भागात आपण आपण पाहू शकणार आहोत शिवानी शिवा कशी झाली, शिवाय एका पार्टीत काही पुरुष दिव्याशी गैरवर्तणूक  करण्याचा प्रयत्न करतात  तेव्हा शिवा येऊन गुंडांपासून तिला वाचवते आणि तिकडे आशुतोष ही उपस्थित असतो. इकडे आशुचे बाबा रामचंद्र देसाई आशुच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिव्याच्या घरी जाणार आहेत. सारख्या येणाऱ्या स्थळांना वैतागून दिव्या स्वतःच्या ऐवजी शिवाची कुंडली दाखवते. आता काय होणार जेव्हा शिवा आणि आशुतोषची कुंडली गुरुजींसमोर येणार?

ऍक्शन, इमोशन आणि ड्रामा ने भरलेला पाहायला विसरू नका 'शिवा' सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा. झी मराठीवर .

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475