जिल्हा
गद्दारी गाडणार, तुतारी वाजवणार
गद्दारी गाडणार, तुतारी वाजवणार
फोटो: ठाणे वैभव
आव्हाडांच्या रॅलीत महिलांचा एल्गार
ठाणे : महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डाॅ.जितेंद्र आव्हाड कळवा येथील प्रचार रॅलीत अनोखे चित्र पहावयास मिळाले. या रॅलीत , "गद्दारी गाडणार, तुतारी वाजवणार... एक नंबरचेच बटन दाबणार", असे म्हणत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या विजयासाठी उपस्थित महिलांनी कंबर कसली.
महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे अधिकृत, लोकप्रिय उमेदवार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री कळवा नाका येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळेस उत्स्फूर्तपणे हजारो महिला उपस्थित होत्या. या महिलांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड कळवा नाका येथे येताच "बंदा नेक... नंबर एक" अशा घोषणा देण्यास सुरूवात केली.
महिलांचा जोश पाहून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी भाषणास सुरूवात केली. मात्र, महिलांनी उत्स्फूर्तपणे, "तुम्हाला प्रचाराची गरज नाही. तुमचे काम दिसतेय... तुमचे काम हाच तुमचा प्रचार" अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, सफर अभी बाकी है... म्हणत कळव्याला विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475