महाराष्ट्र

वाहतूक कोंडी आरवली अन् घोडबंदरची पहाट झाली!

वाहतूक कोंडी आरवली अन् घोडबंदरची पहाट झाली!
वाहतूक कोंडी आरवली अन् घोडबंदरची पहाट झाली! फोटो: ठाणे वैभव
* वाहनांच्या लांबच लांब रांगा * रिक्षाचालकांनी आकारले दुप्पट भाडे ठाणे: आजही घोडबंदर रस्त्याची पहाट वाहतूक कोंडीने सुरू झाली आणि नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने तब्बल तीन तास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही खोळंबली. याचा फायदा रिक्षाचालकांनी उचलत दुप्पट भाडे आकारून नागरिकांची लूट केली. गुरुवारी सकाळीही ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीतून मार्ग काढत प्रवास करावा लागला. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदरवरून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडून घोडबंदरकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जे लोक स्वतःचे वाहन घेऊन निघाले होते ते तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले तर सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहनच उपलब्ध न झाल्याने रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री उशिरापर्यंत ओवळा आणि आर मॉल या ठिकाणी मेट्रोचे गर्डर बसवण्याचे काम सुरू होते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम तत्काळ युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते, असेही राठोड यांनी स्पष्ट केले. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट या वाहतूक कोंडीचा फायदा घेत रिक्षा चालकांनी प्रवाशांची अक्षरशः लूट केली. घोडबंदरपासून ठाणे स्टेशनला जाणाऱ्या शेअर ऑटोसाठी प्रत्येक सीट मागे जिथे पन्नास रुपये आकारले जातात त्याच ठिकाणी रिक्षा चालकांनी दुप्पट भाडे आकारत प्रवाशांकडून शंभर रुपये वसूल केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475