जिल्हा

मार्चनंतर घणघणणार रंगायतनची तिसरी घंटा

मार्चनंतर घणघणणार रंगायतनची तिसरी घंटा
मार्चनंतर घणघणणार रंगायतनची तिसरी घंटा फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनची तिसरी घंटा तीन महिन्यानंतर वाजणार आहे. गडकरी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामानंतर आता दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचे बजेट वाढले आहे. दरम्यान, नाट्यगृहाची डेडलाईन हुकली असल्याने कलाकार, रसिक,नाट्यप्रेमींना अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात असलेल्या महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आले आहे. ९० दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, नाट्यगृहाच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने जवळपास २ ते ३ महिन्याचा कालावधी लागणार असल्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाणार आहे. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जात आहे. रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून महापालिकेच्या तिजोरीतून देखील खर्च करण्यात येणार आहे. नुतनीकरणात प्रामुख्याने प्रवेशद्वाराची आधुनिक रचना, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण, ड्रेसिंग तसेच व्हीआयपी रूम, अद्यावत सीसीटिव्ही कॅमेरे आदी कामांचा समावेश आहे. लाईट, कॅमेरा,ॲक्शन यासाठी काही नाट्यकर्मींशी चर्चा करून या कामांची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. नाट्यगृहाच्या संपुर्ण दुरुस्तीसाठी तब्बल २६ कोटी ९० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी राज्य सरकारकडून आतापर्यंत अवघा आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी दुसऱ्या टप्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475