जिल्हा

प्रशांत कॉर्नरचा गोडवा आता कल्याणमध्येही

प्रशांत कॉर्नरचा गोडवा आता कल्याणमध्येही
प्रशांत कॉर्नरचा गोडवा आता कल्याणमध्येही फोटो: ठाणे वैभव
खडकपाडा येथे १२ व्या शाखेचा शुभारंभ कल्याण : ठाण्यातील प्रसिद्ध मिठाई ब्रांड प्रशांत कॉर्नरचा गोडवा आता कल्याणकरांना देखील चाखता येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथे प्रशांत कॉर्नरच्या १२ व्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार संजय केळकर यांच्याहस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर राहुल दामले, माजी नगरसेवक सुनील वायले, मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष दीपेश ढोणे आदी मान्यवरांसह कल्याणकर नागरिकांनी सदिच्छा भेट दिली. प्रशांत कॉर्नरच्या ठाण्यातील पांचपाखाडी, पोखरण नं. २, वर्तक नगर, कळवा (प), घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, कोलशेत, धामणकरनाका भिवंडी, नेरूळ नवी मुंबई, माणकोली भिवंडी, घणसोली नवी मुंबई या ११ शाखा असून खास लोकाग्रहास्तव कल्याण येथे नव्या शाखेचा शुभारंभ केला आहे. मिठाई क्षेत्रातील ३४ वर्षांची विश्वसनीय सेवा देत असतांना सणापासून सेलीब्रेशनपर्यंत अस्सल मिठाई आणि स्वादांनी तृप्त करण्यास आम्ही सज्ज असल्याची प्रतिक्रिया प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ आणि कल्याण शाखेचे गौरव आहिरे यांनी दिली. प्रशांत कॉर्नरच्या मिठाईसाठी कल्याणकरांना ठाण्याला जावे लागत होते. विशेषतः दिवाळीसारख्या सणाला विशेष मिठाईसाठी प्रशांत कॉर्नरला प्राधान्य असते. आता कल्याणमध्ये प्रशांत कॉर्नरची शाखा सुरु झाल्याने ठाण्याला जावे लागणार नसल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475