जिल्हा
विद्यार्थिनीने चक्क रुग्णालयातून सोडवला बारावीचा पेपर
विद्यार्थिनीने चक्क रुग्णालयातून सोडवला बारावीचा पेपर
फोटो: ठाणे वैभव
अमरावती: अमरावती विभागीय परीक्षा मंडळांतर्गत सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर अचानक विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. मात्र, परीक्षा प्रशासनाच्या तत्परतेमुळे विद्यार्थिनीला रुग्णालयातच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत परीक्षा पूर्ण करता आली.
गणित विषयाची परीक्षा शनिवारी (21 फेब्रुवारी रोजी) सुरू असताना मूर्तिजापूरातील अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेज या परीक्षा केंद्रावरील श्रेया देशमुख हिची प्रकृती सकाळी 10.50 वाजता अचानक बिघडली.
तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याने परीक्षा केंद्रावरील कर्मचारी व उपस्थित पालकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पुढं 11:40 वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जात विद्यार्थिनीशी चर्चा केली.
प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीने परीक्षा देण्यास स्पष्ट संमती दर्शविली. त्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका रुग्णालयात आणण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475