जिल्हा

किसननगरमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला

किसननगरमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला
किसननगरमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला फोटो: ठाणे वैभव
सर्व कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले ठाणे: वागळे इस्टेट भागातील किसननगर ३ येथील तळ अधिक चार मजली पंचशील इमारतीचा पहिल्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग कोसळला. तर उर्वरित भाग धोकादायक झाल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाने इमारतीतील सर्व कुटुंबांना महापालिकेच्या शाळेत हलवले आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत ३५ ते ४० वर्षे जुनी असून इमारत रिकामी करून त्याची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे महापालिकेने सूचना केली होती. या इमारतीत ६० ते ७० रहिवासी राहत असून तळ मजल्यावर सहा दुकाने, एक ते चार मजल्यावर २० खोल्या आणि टेरेसवर तीन खोल्या होत्या. सज्जा कोसळल्याची माहिती सकाळी साडेदहाच्या सुमारास मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, स्थानिक पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी तत्काळ पोहोचले. यावेळी माजी नगरसेवक राम रेपाळे, प्रकाश शिंदे, योगेश जानकर, शैलेश शिंदे हे देखील उपस्थित होते. सज्जा पडल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी उर्वरित बांधकाम धोकादायक झाल्याचे आढळून आल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी संपूर्ण इमारत रिकामी केली. सर्व रहिवाशांना परिसरातील महापालिका शाळा क्र.२३ मध्ये तात्पुरते हलवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475