महाराष्ट्र

ठाणे आरटीओ कर्मचारी संघटनेचा संप अखेर मागे

ठाणे आरटीओ कर्मचारी संघटनेचा संप अखेर मागे
ठाणे आरटीओ कर्मचारी संघटनेचा संप अखेर मागे फोटो: ठाणे वैभव
ठाणे : विविध मागण्यांसाठी ठाणे आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपामुळे तीन दिवसांपासून ठाणे आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. अखेर प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे संप मागे घेतला आहे, असे ठाणे आरटीओ कर्मचारी संघटनेने सांगितले. आरटीओ कर्मचारी संघटनेने कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी 24 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता. गुरुवारी परिवहन आयुक्त कार्यालयात सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यामुळे संघटनेच्या मागण्यांनुसार 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वरिष्ठ लिपिक ते कार्यालय अधीक्षकपदांचे सेवा-प्रवेश नियम अंतिम करण्यात येतील. तोपर्यंत पात्र कर्मचा-यांना तदर्थ पदोन्नती देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. महसूल विभागानुसार बदल्या करण्याचे धोरण रद्द करण्यात आले असून, बदलीसाठी पूर्वीप्रमाणेच १५ विभागांच्या अंतर्गत बदल्या करण्याचेही मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार संप मागे घेण्यात आला आहे, असे माहिती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475