जिल्हा

सिंघानिया शाळेसमोरील रस्ता झाला सुरक्षित

सिंघानिया शाळेसमोरील रस्ता झाला सुरक्षित
सिंघानिया शाळेसमोरील रस्ता झाला सुरक्षित फोटो: ठाणे वैभव
२२ मीटर लांब व ४० मि.मी. रुंद एक्स्पान्शन जॉइंटची तातडीने दुरुस्ती
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून सिंघानिया शाळेसमोरील जुन्या रस्त्यावरील खराब झालेल्या एक्स्पान्शन जॉइंटची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर वारंवार घडणाऱ्या दुचाकी अपघातांना आळा बसला असून दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिंघानिया शाळेसमोरील जुन्या रस्त्यावरील २२ मीटर लांब आणि ४० मि.मी. रुंद एक्स्पान्शन जॉइंट खराब झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी भेग तयार झाली होती. या ठिकाणावरून जाताना अनेक दुचाकीस्वार घसरून पडत होते. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली होती. या बाबतची माहिती काही पत्रकारांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी वाय. एम. तडवी यांना सांगितल्यावर तडवी यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून कोणताही विलंब न करता दुरुस्तीचे काम सुरू केले. अल्पावधीतच २२ मीटर लांब आणि ४० मिमी रुंद एक्स्पान्शन जॉइंटची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली.
दुरुस्तीनंतर रस्ता पुन्हा सुरक्षित आणि सुरळीत झाला असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या दोन विभागांनी समन्वयाने केलेल्या या तातडीच्या कामामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली आहे. यासाठी कार्यकारी अभियंता रणधीर राणे, संदीप गायकवाड, किरण भोये आदींनी अथक मेहनत घेतली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475