जिल्हा
सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत दीड कोटींचे फ्लॅट, ठाण्यात दुकाने?
सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत दीड कोटींचे फ्लॅट, ठाण्यात दुकाने?
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: मुंबईत राहणारा भरत जैन देशातलाच नव्हे, तर जगातला सर्वात श्रीमंत भिकारी आहे. मुंबईत त्याचा दीड कोटींचा फ्लॅट असून ठाण्यात दुकाने असल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.
आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असल्याने भरतला शिक्षण घेता आले नाही. भरत विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आपल्याला शिक्षण घेता आले नाही, पण आपली मुले शिकायला हवीत असे भरतला वाटायचे. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. भरत जैनची एकूण संपत्ती साडेसात कोटी रुपयांच्या घरात जाते. त्याचे महिन्याचे उत्पन्न ६० ते ७५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. जैनचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. त्यांचे मूल्य १.४ कोटी रुपये आहे. ठाण्यात दोन दुकाने आहेत. त्यातून त्याला महिन्याकाठी भाड्यापोटी ३० हजार रुपये मिळतात. भरत जैन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान परिसरात भीक मागतो.
जगातील सर्वात श्रीमंत भिकारी अशी भरत जैनची ओळख आहे. तो दररोज १० ते १२ तास काम करतो. त्यातून त्याला दोन हजार ते अडीच हजार रुपये मिळतात. भरत जैन मुंबईत एका चांगल्या विभागात १ बीएचके ड्युप्लेक्समध्ये राहतो. भरतच्या कुटुंबाने त्याला अनेकदा भीक मागू नका, अस सांगून पाहिले. त्याला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. भरत जैनने भीक मागणे सुरुच ठेवले. भरत जैनची मुले कॉन्व्हेन्ट शाळेत शिकली. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य स्टेशनरी दुकान चालवतात.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475