जिल्हा
पुश बाईकने ९४ दिवसांत कापले 3980 किमी अंतर
पुश बाईकने ९४ दिवसांत कापले 3980 किमी अंतर
फोटो: ठाणे वैभव
सायकलपटू राजेश खांडेकर यांचा जगावेगळा विक्रम
ठाणे: ठाण्यातील वर्तकनगर येथे राहणारे राजेश खांडेकर यांनी पुश बाईक म्हणजे पायाने ढकलायच्या सायकलने ९४ दिवसांत ३९८० किमी अंतर कापत जागतिक विक्रम केला. आतापर्यंत त्यांनी भारतामध्ये अनेक सायकल मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
काहीतरी जगावेगळा विक्रम करण्याच्या उद्देशाने राजेश खांडेकर यांनी सायकलिंग सुरू केली. त्यांचे सायकलींग गुरु उमेश ठाकूर यांच्या प्रेरणेने, सविता ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी जगावेगळी सायकल मोहीम आखली. त्यांनी पुश बाईक म्हणजे पायाने ढकलायची विना पेडल सायकल त्यांच्या वर्कशॉपमध्येच बनवण्यास सुरुवात केली. साधारण दीड महिना सायकल बनविण्यास गेला. सायकलचे वजन साधारण 23 किलो भरले. राजेश यांचे सामान 21 किलो होते. राजेश यांनी सगळ्यात उंच अशा 19024 फूट उंचीवरील रस्त्यावरून राजेश खांडेकर यांनी ९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रवासाला सुरुवात केली. उम्लिंग ला पास येथे पोहोचले तेव्हा सगळीकडे बर्फ पडत होते. साधारण अर्धा तास थांबल्यानंतर ते खाली हाण्ले गावात पोहोचले. मध्येच पाऊस आणि सोसायट्याचा वारा यातच प्रवास सुरू झाला. रस्त्यामध्ये बरेच चांगले लोक त्यांना भेटत गेले. सायकल प्रवासात ते पर्यावरणाबद्दल जनजागृती करत होते. त्यांचा प्रवास दक्षिणेकडे होत असताना रोज रात्री पाऊस पडत होता. अशा वातावरणात त्यांनी जिद्दीने सायकल मोहीम सुरू ठेवून पूर्ण केली. 12 राज्यातून त्यांनी सायकल प्रवास जिद्दीने पार पाडला.
उम्लिंग ला पास, उपसी, चंदीगड अलीगड ,आग्रा, झाशी, नागपूर,
हैदराबाद, बेंगलोर, मदुराई, कन्याकुमारी या मार्गाने त्यांनी प्रवास पूर्ण केला. 3980 किलोमीटरचे अंतर त्यांनी 94 दिवसात कापले. पुश बाईकवरून एवढे अंतर जगामध्ये कोणीही सायकलने कापलेले नाही.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475