जिल्हा

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता रात्रीचा पहारा सुरू!

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता रात्रीचा पहारा सुरू!
प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता रात्रीचा पहारा सुरू! फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात पैसे, वस्तू वाटपाच्या शक्यतेने कार्यकर्ते सावध ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकरिता मागील दहा ते बारा दिवस सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी थंडावल्या. तर आजपासून कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सज्ज झाला आहे. मागील १० ते १५ दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवला होता. विविध पक्षांच्या नेत्यांकडून कार्यकर्ता मेळावा, प्रचार सभा, बैठका, प्रचार रॅली, बाईक रॅली, मतदारांच्या गाठीभेटी, चौक सभा आणि मॉर्निंग वॉक आदींवर भर देण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी ५.३० नंतर निवडणुकीचा प्रचार थांबला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना आता खुला प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी आमिष दाखविण्याचा छुपा खेळ होणार आहे. पालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. १३१ जागांसाठी ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना शिंदे गट, उबाठा, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे या प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहे. तर, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करीत अनेक प्रभागात आपल्याच पक्षातील उमेदवारांसमोर उभे राहून त्यांना आव्हान दिले जात आहे. मंगळवारी सांयकाळी ५.३० नंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तर, पालिकेकडून देखील आचार संहितेचे पालन व्हावे, यासाठी उमेदवारांकडून लावण्यात आलेले फलक हटविण्याची कारवाई हाती घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, ठाणे पालिका क्षेत्रातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचार सभा देखील मोठ्या प्रमाणात झाल्या नसल्याचे दिसून आले. ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची खारीगाव येथे सभा पार पडली. तर, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदार तथा मंत्री अदिती तटकरे यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयाला भेट देत, उमेदवारांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कुठेही प्रचार सभा न घेता बाईक रॅली व रोड शो करीत मतदारांना आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा पार पडली. त्यामुळे पालिका निवडणुकीत प्रचार सभा घेण्याचे अनेक नेत्यांनी टाळल्याचे दिसून आले. चौकसभा, विभाग सभा, भव्य मिरवणुका, बाईक रॅली, रोड शो ने मागील १० ते १२ दिवस गाजत होता. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संध्याकाळी ५.३० वाजता थंडावला असला तरी अजूनही विविध भागातील पक्षांचे बॅनर, पोस्टर आणि झेंडे जागोजागी तसेच असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475