जिल्हा

पोलिसालाच ऑनलाईन गंडा

पोलिसालाच ऑनलाईन गंडा
पोलिसालाच ऑनलाईन गंडा फोटो: ठाणे वैभव
१३ लाखांची फसवणूक, कर्जही काढले बदलापूर : दररोज नागरिकांना ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत पोलीस वारंवार आवाहन करतात, तरीही फसवणूक थांबण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे यावेळी बदलापूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यालाच तब्बल १३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रमोद कोळी हे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एचडीएफसी बँकेतील खात्यातून सुमारे चार लाख २७ हजार रुपयांच्या मुदत ठेवी काढल्या गेल्या, तर त्यांच्या नावाने आठ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या प्रकारामुळे कोळी यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना माहिती देत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फसवणुकीत कोळी यांचा ई-मेल आयडी हॅक करून त्याऐवजी दुसरा आयडी लिंक करण्यात आला होता. या माध्यमातूनच सर्व घोळ घालण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण फसवणुकीची रक्कम १२ लाख ६९,६०० रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांचा मागोवा घेणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475