जिल्हा

गावदेवी भाजी मंडईखालील पार्कींग मे अखेर होणार सुरु

गावदेवी भाजी मंडईखालील पार्कींग मे अखेर होणार सुरु
गावदेवी भाजी मंडईखालील पार्कींग मे अखेर होणार सुरु फोटो: ठाणे वैभव
ठाणे : गावदेवी मैदानाखालील भूमिगत पार्कींगच्या बाजूला असलेल्या भाजी मंडईच्या खालील बाजूचे पार्कींग अखेर सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. येत्या चार दिवसात या संदर्भातील निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार मे अखेरपर्यंत येथील पार्कींग पुन्हा सुरु होईल, असा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे या ठिकाणी २५० च्या आसपास दुचाकी पार्क होऊ शकणार आहेत. स्टेशन भागातील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी गावदेवी भागात भूमिगत पार्कींगची व्यवस्था उभारण्यात आली. काही दिवसांपूर्वी ही सुविधा ठाणेकरांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील पार्कींगची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. दुसरीकडे, याच्या जवळच असलेल्या भाजी मंडईच्या खालील बाजूचे पार्कींग मागील दोन वर्षापासून बंद आहे. याठिकाणी पार्कींग सेवा सुरु होती. परंतु कोरोनाच्या काळात येथील सुविधा बंद करण्यात आली. त्यानंतर अद्यापही ही सुविधा पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलेली नाही. या ठिकाणी २५० च्या आसपास दुचाकी पार्क होऊ शकणार आहेत. त्यातही स्टेशनच्या बाजूलाच ही सेवा असल्याने त्याचा निश्चितच फायदा हा दुचाकी चालकांना होणार आहे. मात्र ही पार्कींग बंद असल्याने, पालिकेचे देखील कोट्यावधींचे उत्पन्न बुडत आहे. त्यातही या संदर्भात निविदा प्रक्रिया राबविली जाईल, अशी उत्तरे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून वारंवार दिली जात होती. परंतु आता येत्या चार दिवसांत नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचा दावा उपायुक्त मनीष जोशी यांनी केला आहे. मे अखेरपर्यंत येथील पार्कींगची सुविधा सुरु केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मे अखेरपर्यंत तरी येथील पार्कींग सुरु होणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475