जिल्हा

पार्किंग व्यवस्था दाखवणार बेशिस्त वाहनचालकांना जागा

पार्किंग व्यवस्था दाखवणार बेशिस्त वाहनचालकांना जागा
पार्किंग व्यवस्था दाखवणार बेशिस्त वाहनचालकांना जागा फोटो: ठाणे वैभव

* शहरात पार्किंग, नो-पार्किंगच्या ९४ जागा * दिवा-मुंब्र्याला व्यवस्थेतून वगळले? * कळव्यात सर्वाधिक ३१ ठिकाणी नो पार्किंग

ठाणे : ठाणेकरांना शिस्त लावण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर गाड्या पार्किंग करण्यासाठी ९४ ठिकाणी नो पार्किंग आणि पी १, पी २च्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मात्र या पार्किंग व्यवस्थेमधून मुंब्रा आणि दिव्याला मात्र वगळण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना या योजनेमुळे शिस्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी नो पार्किंग आणि पार्किंगच्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक ३१ ठिकाणी नो पार्किंगची सोय कळवा येथे करण्यात आली आहे. या भागातील दोन रस्त्यांवर नो एन्ट्री आणि सिग्नलची व्यवस्था देखिल करण्यात आली आहे. घोडबंदर मार्गांवरील कासारवडवली भागातील २९ रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आली आहे. वागळे भागातील २१ रस्त्यांवर नो पार्किंगचे फलक लावण्यात येणार आहेत. ठाणे नगर वाहतूक पोलिस विभागाच्या हद्दीतील १४ रस्त्यांवर नो पार्किंग जाहीर करण्यात आले आहे. कोपरी आणि कापुरबावडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील प्रत्येकी सात रस्त्यांवर नो पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नौपाडा हद्दीतील सहा रस्त्यांवर गाड्या लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ठाणे नगर आणि कोपरी या भागात अनुक्रमे सहा आणि पाच ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. कापुरबावडी आणि नौपाडा भागात प्रत्येकी एका ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कळवा येथे दोन आणि कापुरबावडी येथे तीन ठिकाणी समांतर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ठाणे नगर हद्दीत आठ ठिकाणी, वागळे येथे सहा, कळवा भागात पाच, नौपाडा येथे चार आणि कापुरबावडी येथे तीन ठिकाणी पी १पी २ची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोपरी येथे एक, ठाणे नगर दोन, नौपाडामध्ये चार, कळवा येथे तीन ठिकाणी मर्यादित वेळेकरिता गाड्या उभ्या करण्याची सोय केल्याचे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी जाहीर केले आहे. मागिल आठवड्यात टोईंग विरोधात ठाणेकर रस्त्यावर उतरले होते. पार्किंगची सोय करा, अशी मागणी करण्यात आली होती, त्यामुळे मागिल काही दिवस वाहतूक विभागाचे पोलिस गाड्या शिस्तीत लावण्याचे आवाहन नागरिकांना करत होते. नो पार्किंग आणि पार्किंगची सोय केल्यामुळे वाहतूक पोलिस बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475