जिल्हा

शहापूरच्या जमिनीवरून पाहता येणार आकाशातील रहस्ये

शहापूरच्या जमिनीवरून पाहता येणार आकाशातील रहस्ये
शहापूरच्या जमिनीवरून पाहता येणार आकाशातील रहस्ये फोटो: ठाणे वैभव
जिल्ह्यातील पहिले तारांगण रविवारी होणार खुले श्री.निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण आणि चार अत्याधुनिक, मोठ्या दुर्बीणी असलेली वेधशाळा बांधली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते होणार आहे. निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे. जनमानसात खगोलविज्ञानाची रूची निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे साडेतीन एकर जागा घेऊन तेथे हा सॅपो प्रकल्प उभारला आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून सोबत अत्याधुनिक मोठ्या चार दुर्बीणी असलेली वेधशाळाही त्यामध्ये आहेत. खगोलप्रेमींसाठी शहापूर येथील साकडभाव येथे पोकलेवाडी नजिक जुनोनी-कोथरा रोडवर हा सॅपो प्रकल्प उभारण्यात आला आहे. 7506266266 किंवा 7506322322 या दूरध्वनीवर ठाकूर बंधूंशी संपर्क साधून, नावे नोंदवूनच खगोलविज्ञान प्रेमींना या सॅपो प्रकल्पास भेट देता येणार आहे. अत्याधुनिक तारांगणामध्ये 56 सीटस् असून तेथे अर्धा ते एक तासांचा, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा शो दाखविण्याची सोय आहे. वेधशाळेत चार मोठ्या दुर्बीणी काॅन्क्रीट पीलर्सवर बसविण्यात आल्या असून आकाश निरिक्षण करताना एक बटन दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय करण्यात आली आहे. 16, 14, 10 आणि सहा इंच व्यास असलेल्या आरशाच्या दुर्बिणीतून आकाशातील वेगवेगळ्या गोष्टी निरिक्षण करण्याची सोय आहे. सोलर फिल्टर लावलेल्या एका दुर्बिणीतून दिवसा सारडा, सौरज्वाला निरिक्षण करता येतात. दोन दुर्बीणी संगणकाला जोडलेल्या असून त्यातून दिसणा-या गोष्टींचे छायाचित्रणही करता येते. तसेच प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावर ती गोष्ट दाखविण्याची सोयही तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्र, गुरू ग्रहावरील पट्टा, डाग स्पष्टपणे दिसतो. शनी ग्रहाची वलये, देवयानी दीर्घिका सुंदर दर्शन देतात. रात्रभर आकाश निरिक्षण करता येते. रात्री झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. ग्रुपची डाॅरमेटरी आहेत. या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हाॅल आणि सेल्फ पाॅइंटस् देखील आहेत. आकाशदर्शन घडविण्यासाठी स्वयंसेवकही आहेत. तसेच खाद्यपदार्थ, भोजन यासाठी कॅन्टीनही आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाकूर बंधूनी उभारलेले हे पहिले तारांगण आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475