जिल्हा

कोपरखैरणेतील खुशीने घातली आकाशाला गवसणी

कोपरखैरणेतील खुशीने घातली आकाशाला गवसणी
कोपरखैरणेतील खुशीने घातली आकाशाला गवसणी फोटो: ठाणे वैभव
अमेरिकेत प्रशिक्षण घेऊन झाली वैमानिक नवी मुंबई : कोपरखैरणे गावात राहणाऱ्या खुशी म्हात्रे हिने अमेरिकेतील लॉस एंजेलीस येथे व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने ती आता व्यासायिक वैमानिक बनली आहे. त्यामुळे तिच्यावर नवी मुंबई शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाशीतील सेंट मेरी हायस्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या खुशी हिला लहानपणापासूनच वैमानिक बनण्याची आवड होती. तिच्या पंखांना वडील प्रवीण म्हात्रे यांनी अधिक बळ दिले. त्यामुळे तिने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैमानिक प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील लॉस एंजलिस गाठले. तेथील प्रशिक्षण पूर्ण करून ती आज व्यावसायिक वैमानिक झाली आहे. त्यामुळे तिच्यावर कोपरखैरणेसह संपूर्ण नवी मुंबईतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुशी ही नवी मुंबई शिवसेना उबाठा गटाचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हात्रे यांची कन्या आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475