जिल्हा

एक्सप्रेसखाली पडून तरुणीचा हात खांद्यापासून तुटला

एक्सप्रेसखाली पडून तरुणीचा हात खांद्यापासून तुटला
एक्सप्रेसखाली पडून तरुणीचा हात खांद्यापासून तुटला फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकात फलाट सातवर आलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या एस ५ आणि एस ६ या कोचच्या खाली एक महिला पाय घसरून पडली. यात या महिलेचा हात खांद्यापासून तुटला. ही घटना सोमवारी घडली. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलिस व हमाल घटनास्थळी पोहोचले. महिलेला गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. तसेच उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी महिला पूर्ण शुद्धीवर होती. दोन हमालांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अपघात विभागात ड्युटीवरील डॉ. दत्ता यांनी तत्काळ उपचार सुरू केले. जखमी महिलेने तिचे नाव सीमा शेख (28) रा. शांतिनगर, मोफतलाल कंपनीजवळ असे सांगितले. तिच्या मोबाईलवरून वडिलांना संपर्क करून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली व त्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले. महिलेचा हात पूर्णपणे वेगळा झाल्याने आणि येथे शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475