जिल्हा

प्रियकराने फोन ब्लॉक केल्याने तरुणीची खाडीत उडी

प्रियकराने फोन ब्लॉक केल्याने तरुणीची खाडीत उडी
प्रियकराने फोन ब्लॉक केल्याने तरुणीची खाडीत उडी फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावर एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, खांद्यावर बॅग असल्याने ती तरंगत होती. त्याचक्षणी वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि त्याच्या साथीदारांनी तिला पाण्यात उडी मारून सुरक्षितपणे वाचवले. माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. प्राथमिक तपासात ही मुलगी चेंबूरची रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास घडली आहे. तिच्या प्रियकराने कोणतेही कारण न देता तिचा फोन नंबर ब्लॉक केला होता. त्यामुळे नैराश्य आल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तिने सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475