जिल्हा

एका छोट्या जीवासाठी धावली सिव्हिलची संपूर्ण यंत्रणा!

एका छोट्या जीवासाठी धावली सिव्हिलची संपूर्ण यंत्रणा!
एका छोट्या जीवासाठी धावली सिव्हिलची संपूर्ण यंत्रणा! फोटो: ठाणे वैभव
डॉक्टर, कर्मचारी आणि १०८ टीमच्या समन्वयातून बाळाला मिळाले नवे बळ ठाणे : आईच्या गर्भातच बाळाच्या जीवाला गंभीर धोका असल्याचे समोर आले होते. परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मात्र, एका नवजात जीवासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका टीमने क्षणाचाही विलंब न करता एकत्रितपणे काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाळाला वेळेत पुढील उपचार मिळू शकले. शहापूर तालुक्यातील एका २८ वर्षीय महिलेच्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या छाती आणि पोटामधील पडद्यात गंभीर दोष असल्याचे आढळले होते. त्यामुळे पोटातील काही अवयव छातीमध्ये गेले होते, तर हृदय उजव्या बाजूला सरकले होते. परिस्थिती लक्षात घेऊन सिव्हिल रुग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व बालरोग विभागाने नियोजन केले. पुढील उपचारांसाठी कौशल्या हॉस्पिटलशीही समन्वय साधण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी डॉ. सचिन घोलप, डॉ. रुपाली यादव आणि त्यांच्या टीमने सिझेरियन प्रसूती केली. जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास झाला. डॉ. सुशील दुबे, डॉ. ऐश्वर्या मोरे, डॉ. सुरेश वानखेड यांनी तातडीने उपचार करून बाळाला स्थिर केले. बाळाची प्रकृती स्थिर होताच १०८ रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती. डॉ.बनसोडे यांच्या टीमच्या तत्परतेमुळे बाळाला कौशल्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले. तेथे बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय ओक आणि डॉ. संकेत कुलकर्णी, मेघा मोरे आणि कौशल्या हॉस्पिटलच्या टीमने शस्त्रक्रिया करून छातीमध्ये गेलेले अवयव पुन्हा योग्य ठिकाणी ठेवले आणि पडद्याची दुरुस्ती केली. सध्या बाळ व्हेंटिलेटरवर असून प्रकृती गंभीर आहे. मात्र, सिव्हिलच्या डॉक्टरांनी वेळेत घेतलेले निर्णय, विविध विभागांचा समन्वय आणि १०८ सेवेची तत्परता यामुळे या चिमुकल्या जीवाला पुढील उपचार वेळेत मिळू शकले. अत्यंत गंभीर परिस्थितीत सिव्हिलच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि तत्परतेने काम केले. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि टीमच्या समन्वयामुळे बाळाला पुढील उपचारांसाठी सुरक्षितपणे हलविता आले. या सामूहिक प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे, असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475