जिल्हा

प्रभाग रचनेची मुदत एक महिन्याने वाढली

प्रभाग रचनेची मुदत एक महिन्याने वाढली
प्रभाग रचनेची मुदत एक महिन्याने वाढली फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महापालिकेसह राज्यातील महापालिकेच्या प्रभागांची रचना तयार करण्याची मुदत एक महिना आणखी वाढविण्यात आल्याने २२ ऑगस्ट रोजी नवीन प्रभाग रचना अंतिम करुन ती ठाणेकरांना पाहता येणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २२ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. उद्यापासून गुगल मॅपवर तयार करण्यात येणारी प्रभाग रचना ५ ते १० जुलै दरम्यान तयार करण्यात येणार असून २२ ऑगस्ट रोजी ठाणेकरांना ही प्रभाग रचना पाहता येणार आहे. त्यानंतर त्याबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा प्रसिद्ध केली जाईल, असे नगर विकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुळकर्णी छापवाले यांनी जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475