जिल्हा

इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळली

इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळली
इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळली फोटो: ठाणे वैभव
* नियंत्रण सुटलेल्या कार चालकाने तीन वाहनांना दिली धडक * कारमधील तिघे जखमी ठाणे: कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा व दोन दुचाकींना धडक देऊन कार इमारतीच्या बांधकामासाठी २० फूट खोल खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडली. ही घटना पाचपाखाडी येथे सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. या अपघातात कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघे जखमी झाले असून एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात टाटा सियारा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर एक ऑटो रिक्षा, एक्टिवा बाईक आणि सुझुकी बाईकचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेस्ट ड्राईव्ह वाहनामध्ये तीन व्यक्ती प्रवास करत होत्या. गाडीची एअर बॅग उघडल्यामुळे दोन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. प्रिया (३६) राहणार आधारवाडी, कल्याण यांच्या डोक्याला व कमरेला दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथिलेश पासवान (४८) राहणार आधारवाडी कल्याण यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर टाटा हेरिटेज शोरूम येथील कर्मचारी चेतन देशमुख (३०) राहणार नितीन कंपनी, ठाणे यांच्या पायाला मुका मार लागला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475