जिल्हा

चाक निखळले तरीही बस धावली...

चाक निखळले तरीही बस धावली...
चाक निखळले तरीही बस धावली... फोटो: ठाणे वैभव
चालकाच्या प्रसंगावधा नामुळे जीवितहानी टळली बोईसर : ठाणे ते जव्हार दरम्यान धावणाऱ्या जव्हार आगाराच्या एसटी बसचे मागील चाक निखळून पडल्याचे चालकाच्या लक्षात न आल्याने बस अर्धा किलोमीटर मागील चाकावरच धावत राहिली. सुदैवाने चालकाने वेळेवर बस थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये सुमार े ५० प्रवासी होते. ठाणेहून जव्हारकडे नि घालेली ए स ट ी ब स व ा ड ा - भि वंड ी महामार्गा वरील नेहरोली परिसरात पोहोचली असताना अचानक बसचे मागील एक चाक निखळून रस्त्यावर पडले. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला चालक आणि वाहक यांच्या ही घटना लक्षात आली नाही. त्या मुळे बस सुमार े अर्धा किलोमीटरपर्यंत एका मागील चाकावरच पुढे जात राहिली. याचदरम्यान बसचा दुसरा मागील टायरही फु टल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. दुसरा टायर फु टल्यानंतर बसवरील नि यंत्रण सुटण्याची शक्यता निर्मा ण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. त्या मुळे संभाव्य भीषण अपघात टळला. या एसटी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. त्या मध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475