महाराष्ट्र

बसची विद्युत पोलसह तीन गाड्या आणि घराला धडक

बसची विद्युत पोलसह तीन गाड्या आणि घराला धडक
बसची विद्युत पोलसह तीन गाड्या आणि घराला धडक फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर : हॅन्ड ब्रेक लावून चालक हा खाली उतरल्याने आपोआप सुरू झालेल्या बसने चालकाविना प्रवास करून विद्युत पोलला धडक दिली. तसेच तीन गाड्यांचे नुकसान करून ही बस एका घरावर आदळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. तलरेजा ट्रॅव्हल्स ही बस तक्षशिला शाळेतील सहलीसाठी आणण्यात आली होती. ही बस सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले रोडवर उतारावर उभी करून आणि हॅन्ड ब्रेक लावून चालक खाली उतरला. मात्र आपोआप सुरू झालेल्या या बसने काही अंतरापर्यंत चालकाविना प्रवास करून तीन गाड्यांचे नुकसान करून विद्युत पोलला धडक देऊन एका घरावर आदळली. सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने व ही बस खाली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अनपेक्षित अपघाताप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून गाड्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी संबंधितांनी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475