जिल्हा

घंटा घणघणली, पण पडदा उघडेचना!

घंटा घणघणली, पण पडदा उघडेचना!
घंटा घणघणली, पण पडदा उघडेचना! फोटो: ठाणे वैभव
अखेर नाट्य कलावंतांनी दूर केला पडद्याचा अडसर
अंबरनाथ: मागील वर्षी सुरू झालेल्या अंबरनाथ येथील  नाट्यगृहाचा पडदा काही केल्या उघडेना. अखेर नाटकातील कलाकारांना  हस्तक्षेप करून पडद्याचा अडसर दूर करावा लागला आणि नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली.
अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी विशाखा सुभेदार आणि अन्य कलाकारांची भूमिका असलेले द दमयंती लेले नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. प्रयोगाला नाट्यरसिकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद देखील लाभला होता. मात्र या प्रयोगावेळी मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदा उघडत नसल्याने प्रयोग सुरू होण्यास विलंब झाला. यावेळी नाट्यगृहात कुणीही तांत्रिक कर्मचारी  हजर नसल्याने कलाकारांनाच हाताने पडदा दूर करून नाट्यप्रयोग सुरू करावा लागला.
पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या ध्वनिक्षेपण यंत्रणेत देखील बिघाड झाला होता. मात्र नाटक कलावंतांसोबत असलेल्या  पथकातील जाणकारांनी यंत्रणेतील दोष दूर करत नाटक पुढे सुरू केले. नाटकाचा प्रयोग संपल्यावरही अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना स्वतःच्या हाताने नाट्यगृहाचा पडदा बंद करावा लागला.
नाट्यगृहातील ध्वनिक्षेपण यंत्रणेतील किरकोळ तांत्रिक कारणामुळे पडदा देखील उघडू शकला नसल्याचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475