महाराष्ट्र

दिव्यात फेरीवाल्यांकडून सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की

दिव्यात फेरीवाल्यांकडून सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की
दिव्यात फेरीवाल्यांकडून सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की फोटो: ठाणे वैभव
ठाणे : फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढली असून दिव्यात फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना फेरीवाल्यांकडून धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर दोन वर्षांपूर्वी फेरीवाल्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात पिंपळे यांना दोन बोटे गमवावी लागली होती. त्यानंतरही पालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांच्या हल्ल्याचे प्रकार सुरूच असल्याचे उघड झाले आहे. दिवा रेल्वे स्थानक परिसर, मुंब्रादेवी कॉलनी भागात अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याने दिवा प्रभाग समितीच्या पथकाकडून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांच्या पथकाने फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली. यावेळी मुंब्रादेवी कॉलनी भागात फेरीवाल्यांनी हातगाड्या एका गाळ्यात नेत शटर बंद केले. त्यानंतर फेरीवाल्यांनी पालिका पथकाशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. हा प्रकार हातघाईवर आल्याने या फेरीवाल्यांनी थेट सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांना धक्काबुक्की केली. हे पाहून पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी गुडधे यांचा तत्काळ बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या पथकाची बाचाबाची करणाऱ्या फेरीवाल्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475