जिल्हा

तक्रारी झालेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार फेरतपासणी

तक्रारी झालेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार फेरतपासणी
तक्रारी झालेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार फेरतपासणी फोटो: ठाणे वैभव
आदिती तटकरे यांची माहिती मुंबई: लाडकी बहिण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नावे योजनेतून बाद करण्यात येणार आहेत. त्यासाठी, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यांची पडताळणी होणार असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. राज्यात जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून दरमहा दीड हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. आता, या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे, पण सरसकट पडताळणी होणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी येतील त्यांच्यावर कारवाई होईल. चार चाकी गाड्या असणाऱ्या लाभधारकांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांची पडताळणी होण्याचा विषयच नाही, असेही तटकरे यांनी म्हटले. आपण उलट तपासणी करणार आहोत, 60 ते 70 टक्के लोक असे आहेत जे पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत, त्यांचे उत्त्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. ते या पडताळणीच्या निकषात नाहीत. ज्यांचं आधारकार्ड आणि बँक खाते नंबर मॅच होतं आहे, ते देखील पडताळणीत येणार नाहीत. कारण, त्यांचे उत्पन्न किती आहे हे आपल्या लक्षात आलेले आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेत ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांच्यावर करवाई होईल. दुबार नोंदणी, वाढीव इन्कम आणि मायग्रेशन यांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर करवाई होईल. आत्तापर्यंत ज्यांना पैसे गेले आहेत, परंतु आता ते निकषात बसत नाहीत त्यांना यानंतरचे पैसै मिळणार नाहीत. पण, त्यांचे आजपर्यंत मिळालेले पैसे सरकार माघारी घेणार नाही, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. सरकारच्या विविध विभागांकडून पडताळणी पुढील 8 ते 10 दिवसांत 70 ते 80 टक्के पडताळणी होईल. आम्ही परिवहन विभाग, आयटी विभाग, सेंट्रल गव्हर्मेंटकडून माहिती घेत आधार तपासणीबाबतची मदत घेणार आहोत. या विभागाशी आमचं क्रॉस व्हेरीफिकेशन होईल आणि त्यानंतर योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई होईल, असेही तटकरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475