जिल्हा
महावितरणच्या अनागोदी कारभाराने घेतला कंत्राटी कामगाराचा बळी
महावितरणच्या अनागोदी कारभाराने घेतला कंत्राटी कामगाराचा बळी
फोटो: ठाणे वैभव
मुरबाड: मुरबाड तालुक्यात वीज वितरण कंपनीचा बाराही महिने खेळखंडोबा सुरु असून, त्यांच्या या अनागोदी कारभारामुळे शिरोशी सेक्शनमध्ये कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
मुरबाड तालुक्यातील शिरोशी सेक्शन अंतर्गत देखभाल दुरुस्तीचे काम करताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने चिमाजी पारधी या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिरोशी परिसरात संतापाची लाट उसळली असून, महावितरणच्या ' अनागोदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिरोशी सेक्शन अंतर्गत मौजे सुकाळवाडी येथे राहणारे चिमाजी पारधी हे डीपीवर चढून स्ट्रक्चरच्या मेंटेनन्सचे काम करत होते. नियमानुसार काम सुरू असताना लाईन बंद करूनच काम करणे आवश्यक असते. मात्र, चिमाजी पारधी काम करत असतानाच कुणीतरी अचानक लाईन चालू केली. या भीषण विद्युत धक्क्यामुळे पारधी यांचा जागीच मृत्यू झाला.
अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आणि वरिष्ठांचा वचक नसल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत, असा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
300x450
300x600