महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाची वेबसाईट २६ मे पासून होणार सुरू 

अकरावी प्रवेशाची वेबसाईट २६ मे पासून होणार सुरू 
अकरावी प्रवेशाची वेबसाईट २६ मे पासून होणार सुरू  फोटो: ठाणे वैभव
मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून 11 वीच्या ऑनलाइन (Admission) प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना झाला आहे. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश 26 मे पासून सुरू होणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी 4 दिवस थांबावे लागणार आहे. बुधवार 21 मे रोजी प्रत्यक्षात सुरू होणारी ऑनलाइन अकरावी (SSC results) प्रवेशाची प्रक्रिया वेबसाईटमधील तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर, आता महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून 26 मे ही नवीन तारीख देण्यात आली असून 26 मे ते 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येईल. राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर, 5 जून रोजी पहिली जनरल मेरीट लिस्ट लागणार आहे. 6 ते 7 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येईल. त्यानंतर, 8 जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून दरम्यान आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमांक निवडता येतील, त्यासोबतच संपूर्ण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरता येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 10 जूनला जाहीर होईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. पहिली फेरी 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, ती प्रक्रिया रद्द झाली असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475