जिल्हा

ठाणेकर मयांक राजपूतने पटकावले दुहेरीचे विजेतेपद

ठाणेकर मयांक राजपूतने पटकावले दुहेरीचे विजेतेपद
ठाणेकर मयांक राजपूतने पटकावले दुहेरीचे विजेतेपद फोटो: ठाणे वैभव
ठाणेकर मयांक राजपूतने पटकावले दुहेरीचे विजेतेपद ठाणे : यवतमाळ येथे पार पडलेल्या 'योनेक्स-सनराईज एफएफ जवाहरलाल दर्डा मेमोरियल दुसऱ्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर १५ आणि १७ वर्षांखालील अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या मयांक राजपूत याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. दुहेरीच्या अंतिम सामन्यात मयांक राजपूत आणि त्याचा साथीदार प्रग्यय शिंदे यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर ह्रीदान पाडवे व विहान कोल्हाडे या जोडीचा १५-११, १५-१२ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. याच स्पर्धेत मयांकने १५ वर्षांखालील एकेरी गटातही उत्तम खेळ दाखवत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. मयांक राजपूत हा ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमी चा खेळाडू आहे. त्याला अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्यासह प्रशिक्षक अक्षय देवलकर, मयूर घाटणेकर, मितेश हाजीरनीस आणि राजीव गणपुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475