जिल्हा

ठाण्याची गितांजली गोखले सीएमए परीक्षेत देशात ३० वी

ठाण्याची गितांजली गोखले सीएमए परीक्षेत देशात ३० वी
ठाण्याची गितांजली गोखले सीएमए परीक्षेत देशात ३० वी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यातील गितांजली गोखले ही ‘सीएमए’ (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) अंतिम परीक्षेत देशात ३० वी आली. तिला ८०० पैकी ५५३ गुण मिळाले. राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारी ती मुंबई विभागातील एकमेव विद्यार्थिनी आहे. गितांजली हिची आई शिवानी गोखले या लेखिका असून वडील अभियंता आहेत. तिची बहीण सध्या सीएचा अभ्यास करत आहे. गितांजलीचे दहावीपर्यंतचे शिक्षण डोंबिवली येथील विद्या निकेतन शाळेत झाले. त्यानंतर तिने विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. संसदीय कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामार्फत तिने फाउंडेशन, इंटरमीडिएट व अंतिम असे सीएमए अभ्यासक्रमाचे तीनही टप्पे पूर्ण केले. अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी गितांजलीने शेवटचे चार महिने आजी-आजोबांकडे राहून अभ्यास केला. या कालावधीत ती दररोज १४ ते १५ तास अभ्यास करत होती. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने सामाजिक कार्यक्रम, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाणे तसेच गिटार वादनाचाही सराव थांबवला होता. अभ्यासक्रमातील आठही विषयांना समान महत्त्व देत नियोजनबद्ध तयारी केल्याचे ती सांगते. अभ्यासाबरोबरच गितांजलीने कथकच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या असून शालेय जीवनात ती दहावीपर्यंत राज्यस्तरीय बास्केटबॉल खेळाडू होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475