जिल्हा

रिदमिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत ठाण्याची 'किमया'

रिदमिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत ठाण्याची 'किमया'
रिदमिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत ठाण्याची 'किमया' फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रोमानिया येथे झालेल्या रिदमिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत ठाण्यातील १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय रिदमिक जिमनास्ट किमया कार्ले हिने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २५ ते २८ जुलै २०२५ दरम्यान रोमानियातील कलूज-नापोका येथील बीटी अरेना कॉम्पिटिशन हॉलमध्ये झालेल्या एफआईजी वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना किमया कार्ले हिने एक नवा बेंच मार्क प्रस्थापित केला आहे. मागील १४ वर्षांपासून द फिनिक्स जिम्नॅस्टिक ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेली किमया एक प्रतिभावंत गुणवान खेळाडू म्हणून उदयास येत आहे. तिची अलीकडील कामगिरी भारतातील या खेळासाठी महत्वाचा टप्पा ठरत आहे. एफ आई जी वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सध्याच्या २०२५ ते २०२८ या ऑलिम्पिक सायकलमधील सहाव्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड सिरीज स्पर्धेत क्लब्ज या प्रकारात २३.०० गुण मिळविणारी किमया ही पहिली भारतीय जिमनास्ट ठरली आहे. एका भारतीय रिदमिक जिमनास्टने मिळविलेले आतापर्यंतचे हे सर्वोच्च गुणांकन आहे. किमया हिच्या बॉल रुटीनमधील सौन्दर्यपूर्ण कलात्मकतेच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. ते सादरीकरण इतके प्रभावी होते की एफ आई जी मीडिया प्रतिनिधी ऍना कुल यांनी ती पोस्ट त्यांच्या एफ. बी. पेज वर शेअर केली आहे. किमया हिच्या क्लब्ज आणि बॉल प्रकाराच्या सादरीकरणाची संपूर्ण कोरिओग्राफी प्रशिक्षिका मानसी सुर्वे-गावंडे यांनी केली आहे. या सर्व वाटचालीत ठाणे जिल्हा जिमनास्टिक असोसिएशन, एस वी पी एम स्पोर्ट्स अकॅडेमी, आर्य क्रीडा मंडळ आणि श्रीरंग विद्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475