जिल्हा

सागरी जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटू चमकले

सागरी जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटू चमकले
सागरी जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटू चमकले फोटो: ठाणे वैभव
ठाणे: विजयदुर्ग येथे पार पडलेल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विविध गटांमध्ये पदकांची कमाई केली. सागरी पाण्यातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. ५०० मीटर स्पर्धेत निवेश वाव्हळ याने तृतीय क्रमांक पटकावला. शर्मिन तांडेल हिने पाचवा क्रमांक पटकावला. एक किलोमीटर स्पर्धेत सिध्द मुप्पेनीटी याने तृतीय क्रमांक आणि रियांश पाटील याने सहावा क्रमांक पटकावला. स्मित कोळी याने सहावा क्रमांक पटकावला. दोन किलोमीटर स्पर्धेत समिप्ता वाव्हळ हिने द्वितीय क्रमांक आणि धृती कोळी हिने तृतीय क्रमांक पटकावला. तीन किलोमीटर स्पर्धेत स्पर्धेत आरीत जिंदाल, सुयश हिंदळेकर, वरद कोळी, कैवल्य राणे यांनीही उत्तम कामगिरी केली. पाच किलोमीटर स्पर्धेत समिधा मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला आणि गार्गी राऊत हिने दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवला. पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रेयांश खामकर याने चार सुवर्ण पदके पटकावली. हे सर्व जलतरणपटू ठाणे महानगर पालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करतात. या यशामुळे ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेच्या सर्व सदस्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कामगिरी करत राहण्याचा आत्मविश्वास या यशामुळे अधिक दृढ झाला आहे. या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक राजेश मोरे, धनंजय कुलकर्णी, वैभव देशमुख, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, तरण तलाव उपव्यस्थापक रवी काळे यांनी विशेष कौतुक केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475