जिल्हा

एशियन पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ठाणेकरांचे वर्चस्व

एशियन पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ठाणेकरांचे वर्चस्व
एशियन पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ठाणेकरांचे वर्चस्व फोटो: ठाणे वैभव
ठाणे: इंटरनॅशनल एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारताला दोन गोल्ड मेडल, दोन सिल्वर मेडल सोबतच एशियन स्ट्रॉंग मॅन किताब, गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल पटकावून देणारे सर्वच खेळाडू ठाणेकर आहेत. केरळ येथे झालेल्या इंटरनॅशनल एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताला दोन गोल्ड मेडल तर दोन सिल्वर मेडल व एक स्ट्रॉंग मॅनचा किताब प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू ठाणे शहरातील आहेत. ठाण्यातील कोपरी परिसरातील द युनायटेड स्पोर्ट्स क्लब येथील व्यायाम शाळेत सराव करणाऱ्या चाळके फिट अँड फाईनमधील राजेश शेटे यांनी गोल्ड मेडल, समृद्धी देवळेकर गोल्ड मेडल तर धर्मेंद्र यादव व जितेंद्र यादव या दोघांनी सिल्वर मेडल पटकावले आहे. यामध्ये जितेंद्र यादव हा एशियन स्ट्रॉंग मॅनचा देखील मानकरी ठरला आहे. हे सर्व खेळाडू मध्यम वर्गीय असून अनेक प्रसंगांवर मात करत ते इंटरनॅशनल एशिया स्पर्धेमध्ये पोहोचले आहेत व पुढे परदेशात होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये जाण्याचा त्यांचा मानस आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475