जिल्हा

ठाण्यातील काही भागात आज व उद्या पाणी नाही

ठाण्यातील काही भागात आज व उद्या पाणी नाही
ठाण्यातील काही भागात आज व उद्या पाणी नाही फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे काटई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ठाण्यात काही भागात गुरूवार 18 जानेवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार 19 जानेवारी 2024 रात्री 12 पर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2 नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहिल. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475