जिल्हा

शहरातील रस्त्यांची धुलाई; नाल्याचीही झाली सफाई; आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

शहरातील रस्त्यांची धुलाई; नाल्याचीही झाली सफाई; आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
शहरातील रस्त्यांची धुलाई; नाल्याचीही झाली सफाई; आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सर्वंकष स्वच्छता मोहिम आज ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत रस्तेसफाईबरोबर या परिसरात असलेल्या नाल्यांमधील गाळ काढण्यात आला. नालेसफाई ही फक्त पावसाळ्यापूर्वी न करता आतापासूनच नियमित नाल्यातील गाळ काढल्यास पावसाळ्याअगोदर बहुतांश नालेसफाई होईल असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केला. उथळसर प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका भवन येथून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. सर्वप्रथम रस्ते झाडून स्वच्छ करणे, त्यानंतर दुभाजक, फूटपाथ हे स्क्रबरच्या साहाय्याने घासून त्यानंतर पाण्याने रस्ते स्वच्छ करण्यात आले. सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शहरातील रस्त्यांची सफाई जरी होत असली तरी परिसरातील नाल्यांमध्ये अडकलेला गाळ काढणे देखील तितकेच महत्वाचे असून आज वंदना एसटी डेपो शेजारील, आंबेडकर रोड , आनंदपार्क नाला, ऋतुपार्क येथील नाल्यातील गाळ काढण्यात आला. तसेच चेंबर्सची झाकणे उघडून चेंबरमध्ये अडकलेले प्लॅस्टिक, तत्सम कचरा काढण्यात आला. शनिवारी झालेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत टेंभीनाका परिसरातील चिंतामणी चौक, गणेश टॉकीज, आंबेडकर रोड, विकास पाम, लॉरी स्टॅड, सिव्हिल हॉस्प‍िटल सर्कल, खोपट सिग्न्ल, मखमली तलाव परिसर, नूरी बाबा दर्गा रोड, उथळसर नाका, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह ते कळवा सर्कल, जेल तलाव ते एनकेटी नाका, कोर्टनाका परिसर, पोलीस कमिशनर ऑफिस ते कळवा खाडी, पोलीस लाईन, कडवा गल्ली, फ्लॉवर व्हॅली परिसरातील कॅडबरी सिग्नल ते दत्तमंदिर, हरिदास नगर परिसर, प्रताप टॉकीज, कोलबाड जागमाता मंदिर, सावरकर मैदान, मीनाताई ठाकरे चौक परिसरातील गोकुळनगर, माजिवडा ब्रीज खालील परिसर, वृंदावन बस स्थानक व वृंदावन परिसर, गोल्डन डाईज नाका, केव्हीला नाका राबोडी येथील तबेला रोड, कत्त्ल खाना, ट्राफिक पोलीस चौकी राबोडी परिसरातील आकाशगंगा रोड, संतोषीमाता आतील परिसरा, महालक्ष्मी रोड पंपीग हाऊस साकेत, कळवा सर्कल ब्रीज ते खाडी ब्रीज, साकेत रोड पंपीग हाऊस, नितीन कंपनी परिसर, वंदना बसस्थानक परिसर, शाहिद उद्यान आदी सर्व परिसरातील रस्ते झाडून ते पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आले. वंदना एसटी स्टॅण्ड येथील पाहणी आज आयुक्तांनी केली. पावसाळ्यात या परिसरात पाणी साचते. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या नाल्यातील गाळ नियमित वरचेवर काढला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त अभिजीत बांगर, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेविका दीपा गावंड, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475