महाराष्ट्र

बदलापूर-अंबरनाथमधील सोसायट्यांचा ठाणे फेरा टळणार

बदलापूर-अंबरनाथमधील सोसायट्यांचा ठाणे फेरा टळणार
बदलापूर-अंबरनाथमधील सोसायट्यांचा ठाणे फेरा टळणार फोटो: ठाणे वैभव
बदलापूर येथे हाऊसिंग फेडरेशनची शाखा ठाणे : बदलापूर-अंबरनाथमधील गृहनिर्माण सोसायट्यांचा ठाण्याचा फेरा टळणार आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या बदलापूर पूर्वेकडील नूतन शाखेचे उद्घाटन येत्या ४ फेब्रुवारीपासून रोजी सकाळी १० वाजता भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते आणि सहकारी संस्था अंबरनाथचे सहायक उपनिबंधक चेतन चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी १०:३० वाजता गांधी चौक येथील काटदरे मंगल कार्यालयात मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी गुरुवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बदलापूर-अंबरनाथ वासियांना ही नववर्षाची भेट असून एक प्रकारे फेडरेशनच्या निवडणुकीत गृहसंकुलांना दिलेल्या आश्वासनाची ही परिपुर्ती असल्याचे सीताराम राणे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढत असलेल्या बदलापुर- अंबरनाथ उपनगरात तीन ते चार हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्या असून येथे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे तब्बल दीड हजार सभासद आहेत. गृहनिर्माण संस्थासंबंधी तक्रारी व समस्याचे निराकरण करण्यासाठी या सभासदांना ठाणे येथे यावे लागत असते. त्यातच आजघडीला नागरीकरण वाढत असल्याने तसेच, भविष्यात बदलापूर-अंबरनाथ भागात आणखी गृहनिर्माण प्रकल्प होत आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थाविषयक अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच गृहनिर्माण संस्थांना कामकाजात मार्गदर्शन व मदत करण्याच्या उद्देशाने ठाणे डिस्ट्रीक्ट को-ऑप.हौसिंग फेडरेशनची नविन शाखा बदलापूर (पूर्व) येथील ४०३, तेलवणे टॉवर, स्टेशन पाडा, मच्छी मार्केटसमोर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सीताराम राणे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600