जिल्हा

ठाण्यातील रिक्षाचालकांचा मनसेला पाठींबा

ठाण्यातील रिक्षाचालकांचा मनसेला पाठींबा
ठाण्यातील रिक्षाचालकांचा मनसेला पाठींबा फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे शहरातील रिक्षा चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठींबा दर्शविला आहे. ठाण्यातील शेकडो रिक्षा चालकांनी नुकतीच ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपले जाहिर समर्थन दिले आहे. ठाणे शहर विधानसभा मतदार संघात मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले अविनाश जाधव हे ठाणे व पालघर जिल्ह्यातील गोरगरीब तसेच अडलेल्या नडलेल्यांसाठी २४ तास उपलब्ध असतात. किंबहुना अनेकांना २४ तासातच न्याय मिळवून देतात. रिक्षावाल्यांच्या अडचणी आरटीओ, वाहतूक पोलीस किंवा इतर अनेक समस्या असतील त्या प्रत्येक रिक्षा चालकांच्या सुखा दुःखात ते उभे राहतात, अशी प्रतिक्रिया देत शेकडो रिक्षा चालकांनी त्यांची भेट घेऊन पाठींबा जाहिर केला आहे. राज्यातील घाणेरडे राजकारण बघता सुसंस्कृत आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवे, यासाठी आगामी निवडणूकीत मनसेच्याच उमेदवारांना मतदान करण्याचा निर्धार रिक्षा चालकांनी बोलुन दाखवला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475