जिल्हा

ठाणे महापालिका झाले 'फॅमिली मॅटर'!

ठाणे महापालिका झाले 'फॅमिली मॅटर'!
ठाणे महापालिका झाले 'फॅमिली मॅटर'! फोटो: ठाणे वैभव
सभागृहात दिसणार नाती-गोती ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक उमेदवार एकाच घरातील असून भाजपने देखील दोन उमेदवार एकाच घरातील दिले होते. त्यामुळे आगामी सभागृहात नात्यांचा मेळा पाहायला मिळणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने खासदार नरेश म्हस्के आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मुलाला उमेदवारी नाकारून एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला असलबतरी इतर ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन ते तीन जणांना उमेदवारी दिली आहे. निकालानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये एकमेकांच्या नातलगांचाच भरणा लक्षणीय असल्याचे दिसते. प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. दर्शना जानकर आणि त्यांचे पती योगेश जानकर हे दोघेही विजयी झाले असून पती-पत्नींची जोडी थेट सभागृहात एकत्र दिसणार आहे. भाजपकडून कृष्णा पाटील आणि त्यांच्या पत्नी नंदा पाटील यांनीही विजय मिळवला असून, आणखी एक दाम्पत्य महापालिकेच्या कामकाजात सहभागी होणार आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून जयश्री फाटक बिनविरोध निवडून आल्या असून, त्यांचे दिर राजेंद्र फाटक यांनीही विजय संपादन केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे हे दीर-भावजय महापालिकेत एकत्र काम करताना दिसणार आहेत. शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पत्नी एकता भोईर या प्रभाग क्रमांक १७ मधून बिनविरोध निवडून आल्या असून, सून यज्ञा भोईर प्रभाग क्रमांक १५ मधून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहात सासू-सुनेची जोडी पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे देवराम भोईर हे स्वतः आणि त्यांचा पुत्र संजय भोईर तसेच त्यांच्या दोन सुना सपना भोईर आणि उषा भोईर असे एकाच कुटुंबातील चौघेजण निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भोईर कुटुंबाचे हे संपूर्ण पॅनलच निवडून आल्याने या प्रभागात भोईर कुटुंबाचा दबदबा पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंदार केणी आणि त्यांच्या मातोश्री प्रमिला केणी हे दोघे मायलेक पुन्हा विजयी झाले आहेत. तसेच माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि त्यांची मुलगी साक्षी मढवी हेही सभागृहात एकत्र दिसणार आहेत. दिवा परिसरातून प्रभाग क्रमांक २८ चे प्रतिनिधित्व रमाकांत मढवी आणि पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवलेली त्यांची कन्या साक्षी मढवी करणार आहेत. ठाणे महापालिकेमध्ये पती-पत्नी किंवा नोतेवाईक एकत्रित निवडून येण्याची परंपरा राहिली आहे. पण यावेळी ही संख्या जास्त दिसत आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरून पालिकेचे सभागृह गाजताना नात्यांचे रंगही अनुभवायला मिळणार आहेत. याशिवाय एकाच पॅनलमध्ये किंवा जवळच्या प्रभागातील पॅनलमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य निवडून आल्याने एकाचवेळी दोन प्रभागांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475