जिल्हा

ठाणे महापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारीला

ठाणे महापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारीला
ठाणे महापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारीला फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार आहे. ३० जानेवारी रोजी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिंदे गटाकडून महापौरपदासाठी सात जणांची नावे पुढे आली आहेत.अनुसूचित जाती प्रवगार्साठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिंदे सेनेत सात जणांची नावे पुढे आली आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) पद्मा भगत, प्रभाग ६ (अ) वनिता घोगरे, प्रभाग ७ (अ) विमल भोईर, प्रभाग ९ (अ) - गणेश कांबळे, प्रभाग १६ (अ) - डॉ. दर्शना जानकर, प्रभाग २४ (अ) आरती गायकवाड आणि प्रभाग २८ (अ) दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर भाजपने देखील महापौर पदावर दावा केला आहे. भाजपकडून देखील दोन नावे पुढे आली आहेत. यात सुरेश कांबळे आणि वैशाली वाघ यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475