जिल्हा
ठामपा संघाची पीडब्ल्यूडीवर मात
ठामपा संघाची पीडब्ल्यूडीवर मात
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: येथील सेंट्रल मैदानावर आज झालेल्या 'क' गटातील दुसऱ्या फेरीत ठाणे महानगरपालिकेने पीडब्ल्यूडी ठाणे संघाची ८३ धावसंख्या एक विकेटच्या मोबदल्यात ओलांडून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ठाणे महापालिका संघाचा मध्यमगती गोलंदाज हर्षल सोनीने पीडब्ल्यूडीचा निम्मा संघ अवघ्या १२ धावांत गुंडाळला तर डावखुऱ्या जयदीप परदशीने १६ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ३५ धावा फाटकावून ठाणे महापालिकेचा विजय साजरा केला.
संक्षिप्त धावफलक: पी.डब्ल्यूडी, ठाणे २२.२ षटकात ८३ (विश्वास पाटील २७, प्रवीण शिरसाट १९, हर्षल सोनी ५.२-१-१२-५, शशिकांत कदम ७-२-२५-३) पराभूत वि. ठाणे महानगरपालिका ६.५ षटकात १ बाद ८६ (जयदीप परदेशी नाबाद ३५, ओंकार रहाटे नाबाद २०, पंकज पवार २-०-२१-१
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475